ABOUT

धनलक्ष्मी स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट बद्दल:

धनलक्ष्मी स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटची स्थापना 2012 मध्ये करण्यात आली असून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण हेल्थकेअर शिक्षण देणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेने 10,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना हेल्थकेअर क्षेत्रात करिअर सुरू करण्यास मदत केली आहे. संस्थेमध्ये प्रॅक्टिकल शिक्षण, कौशल्य विकास आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांना आत्मविश्वासपूर्ण व जॉब-रेडी बनवणे हे आमचे ध्येय आहे.
ही संस्था शासन मान्यताप्राप्त असून 100% प्लेसमेंट टिकवून ठेवण्यासाठी गौरविण्यात आली आहे.
ही संस्था कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवोन्मेष विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण मंडळामार्फत मान्यताप्राप्त आहे.

संस्था कोड: MSB070403

आमचा पाया:
ही संस्था 2010 मध्ये स्थापन झालेल्या प्रो. टी. पी. निकम मल्टीपर्पज इन्स्टिट्यूट अंतर्गत कार्यरत आहे. ही संस्था F-12596/नाशिक या नोंदणी क्रमांकाने नोंदणीकृत असून सामाजिक, आरोग्य, बँकिंग आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे.

वर्षांचा वैद्यकीय अनुभव
0 +
साली इन्स्टिट्यूटची स्थापना
0
विद्यार्थी नियुक्त
0 %
विद्यार्थ्यांना करियरमध्ये मदत
0 +

धनलक्ष्मी इन्स्टिट्यूटची भक्कम लीडरशिप

डॉ. अरुण पी. निकम

संस्थापक अध्यक्ष

डॉ. अरुण पी. निकम हे धनलक्ष्मी स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटचे संस्थापक असून त्यांना वैद्यकीय क्षेत्रात 40+ वर्षांचा अनुभव आहे.
ते स्वतः 15 बेड आणि ऑपरेशन थिएटर असलेले धनलक्ष्मी नर्सिंग होम हे हॉस्पिटल चालवतात आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात सक्रिय भूमिका बजावतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना थिअरीसोबत प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो आणि ते आत्मविश्वासाने काम करण्यास तयार होतात.
गेल्या 4 दशकांमध्ये डॉ. अरुण निकम यांनी अगणित विद्यार्थ्यांना करियर घडवण्यात मदत करून त्यांना स्वावलंबी आणि आत्मविश्वासाने जगण्याची शिकवण दिली आहे.

प्रो. टी. पी. निकम

प्रिन्सिपल

प्रो. टी. पी. निकम हे या संस्थेच्या मूळ संस्थेचे (प्रो. टी. पी. निकम बहुउद्देशीय संस्था) संस्थापक असून त्यांनी शिक्षण क्षेत्रात भक्कम पाया रचला आहे.
ते महात्मा फुले नगरी सहकारी पतसंस्था, चांदवड चे संस्थापक व अध्यक्ष असून, ही संस्था परिसरातील ‘A’ श्रेणी प्राप्त करणारी एकमेव संस्था आहे. तसेच ते धनलक्ष्मी स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटचे प्राचार्य म्हणूनही कार्यरत आहेत आणि विद्यार्थ्यांच्या करिअर विकासासाठी सक्रियपणे मार्गदर्शन करतात.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाद्वारे सक्षम बनवणे आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी संधी उपलब्ध करून देणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे.

आमची दृष्टी

कौशल्यपूर्ण, आत्मविश्वासपूर्ण आणि समाजाभिमुख
हेल्थकेअर प्रोफेशनल्स घडवणे.

गुणवत्तापूर्ण सेवेद्वारे समाजात सकारात्मक
आणि टिकाऊ बदल घडवणे.

आमचे ध्येय

विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल आणि कौशल्याधारित शिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवणे.

ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून व्यावसायिक क्षेत्रासाठी तयार करणे.

आमचा उद्देश

विद्यार्थ्यांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.

“स्वयंरोजगारातून स्वावलंबन, नारीशक्तीचे सबलीकरण” हि आमची विचारधारा आहे.

धनलक्ष्मी इन्स्टिट्यूटमधील सुविधा

सुसज्ज, हवेशीर वर्गखोल्या

हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकल व्यवस्था

लॅब सुविधा

अनुभवी डॉक्टरांचे मार्गदर्शन

विद्यार्थ्यांसाठी शिस्तीचे वातावरण

विद्यार्थ्यांना होस्टेलसंबंधीच्या सुविधा

आत्ताच ऍडमिशन फॉर्म भरा

प्लेसमेंटच्या १००% गॅरंटीसह आजच आपल्या करिअरची सुरुवात करा.
• प्रवेश सुरू • मर्यादित जागा उपलब्ध 


धनलक्ष्मी नर्सिंग आणि पॅरामेडिकल
स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट

मोबाईल नंबर

+91 94222 57550

ई-मेल

drnikamarun@gmail.com

पत्ता

निकम प्लाझा, लक्ष्मी नर्सिंग होम, बाजारतळ, चांदवड, नाशिक.
423101